आमदार बच्चू कडू यांचे कुणी केले वांधे? म्हणाले, सहा मजले सुधारले तरी अख्खा महाराष्ट्र…’
सडेतोड बोलण्यासाठी प्रसिध्द असलेले आमदार बच्चू कडू यांनी आता थेट मंत्रालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. वर्धा येथील कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांनी मोठी इमारत बांधण्यात काही अर्थ नाही. तिथली माणसं मोठी असली पाहिजे, असं विधान केलंय.
वर्धा : 13 ऑक्टोबर 2023 | वर्धा येथील दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने आयोजित दिव्यांगाच्या दारी अभियान कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयातून चालणाऱ्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. फक्त मोठी इमारत असून चालत नाही. मोठी इमारत बांधण्यात काही अर्थ नाही. तिथली माणसं मोठी असली पाहिजे. नाही तर एवढ्या मोठ्या मंत्रालयात सात मजले. कालच एका अधिकाऱ्याला झापून आलोय. मंत्रालयातील सहा मजले जरी सुधारले तरी अख्खा महाराष्ट्र सुधारेल बघा असा टोला आमदार कडू यांनी लगावला. पण, पाणी मंत्रालयातच मुरतेय. तिथेच सगळी चिरीमिरी आहे. जिथं आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव बसतात त्या मंत्रालयातच गोंधळ आहे. तुम्हाला माहित आहे का की बदलीसाठी काय काय करावं लागतं? लई वांधे आहेत, असेही आमदार बच्चू कडू म्हणाले.
Published on: Oct 13, 2023 08:59 PM