अमरावतीत समझोता एक्सप्रेस! बच्चू कडू-रवी राणा एकाच मंचावर, तोंडभरून कौतूकही; अनेकांच्या भुवया उंचावल्या
नेत्रदान संकल्प दिनाच्या कार्यक्रमा निमित्ताने एकाच व्यासपिठावर आमदार रवी राणा ही असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. यावेळी अमरावती लोकसभेवरून आता दोघांत जोरदार बॅटींग होणार असा कयास अनेकांचा होता. मात्र तो फोल ठरला
अमरावती : आमदार बच्चू कडू हे अपंग कल्याण विभागाचे नुकतेच अध्यक्ष झाले आहे. त्यानंतर त्यांचा येथे पहिलाच कार्यक्रम झाला. नेत्रदान संकल्प दिनाच्या कार्यक्रमा निमित्ताने एकाच व्यासपिठावर आमदार रवी राणा ही असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. यावेळी अमरावती लोकसभेवरून आता दोघांत जोरदार बॅटींग होणार असा कयास अनेकांचा होता. मात्र तो फोल ठरला कारण हा टोले घ्यायचा कार्यक्रम नाही असचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. तसेच अपंगांचा सेवा करायची आहे, यात मला ३६ जिल्हात गावा गावात जायचं आहे. अपंगाची सेवा करायची व टोले घ्यायची मला सवय आहे असं विधान बच्चू कडू यांनी केलं. तर बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा मिळाल्याने आमदार रवी राणा यांच्या कडून कौतूक करण्यात आलं.
Published on: Jun 12, 2023 09:42 AM