भाजपकडून मुस्कटदाबी होतेय का? या प्रश्नावर बच्चू कडू स्पष्टच बोलले, ‘शिवसेनेच्या आमदारांना….’

| Updated on: Jun 14, 2023 | 10:21 AM

भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर वेळ देत नाहीत. आमची कामे करत नाहीत. उलट भाजपकडून शिंदे गटावर मोठा अन्याय सुरु असल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटेंनी केला होता. त्यानंतर आता यात युतीच्या घटक पक्षांची सुद्धा भर पडताना दिसत आहे.

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद सुरू आहे. शिवसेना व भाजपा मध्ये धुसफूस सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर वेळ देत नाहीत. आमची कामे करत नाहीत. उलट भाजपकडून शिंदे गटावर मोठा अन्याय सुरु असल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटेंनी केला होता. त्यानंतर आता यात युतीच्या घटक पक्षांची सुद्धा भर पडताना दिसत आहे. प्रहारचे संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी देखील भाजपडून शिवसेनेच्या आमदारांना त्रास दिला जातोय असे म्हटलं आहे. ज्यामुळे आता एकच चर्चा होताना दिसत आहे. त्याचबरोबर त्यांनी, कालच्या जाहिरातीवरून शिंदे-फडणवीस यांच्यात मिठाचा खडा पडला असं बोललं जात असल्यावरही प्रतिक्रिया देताना असं मोठ्या नेत्यांमध्ये कधी होत नाही. कारण सत्ता. पण हे कार्यकर्त्यांमध्ये होतं असं म्हटलं आहे. तर भाजपणे शिंदे यांची कदर करावी असंही त्यांनी सुनावलं आहे.

Published on: Jun 14, 2023 10:21 AM
धक्कादायक! मामाचं भाच्यावर हे कसलं प्रेम? वाढदिवसानिमित्त दिलं असं गिफ्ट की पोलीसांनी…
…तर मालाड सबवेजवळ पाणी तुंबणार नाही, पंपिंग मशीन ऑपरेटर काय म्हणाले?