अपघातावरून राजकारण केले, बच्चू कडू यांनी सांगितला अपघाताचा थरार
आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्यानंतर हा अपघात नसून घातपात असल्याची टीका करण्यात आली होती. त्याला खुद्द बच्चू कडू यांनीच उत्तर दिले आहे.
अमरावती : माझ्या अपघातावरून चुकीचे राजकारण करण्यात गेले असे आमदार बच्चू कडू ( mla bachu kadu ) यांनी म्हटले आहे. त्या चर्चेला काही अर्थ नाही. मीच गोंधळलो होतो. मामुली गोंधळात हा अपघात झाला. ज्यांच्या अपघात झाला त्यांनी बोलले तर ठीक आहे. पण बाकीचेच लोक बोलत आहेत. कुणी मेलं तरी राजकारण, कुणी जन्माला आलं तरी राजकारण. कुणी पडलं अपघात झाला तरी राजकारण, त्यावर वेगवेगळ्या कॉमेंट्स येतात. आरोप करावेत पण त्याची शहानिशा करून, मला न विचारता बाहेरच्या बाहेर काही जण घातपात झाला म्हणतात त्यांनी असे काही म्हणण्याची गरज नाहीय, असे आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.
Published on: Jan 23, 2023 07:32 AM