‘भगव्याचा सहारा घेऊन तिरंग्याला डीवचण्याचा प्रयत्न करू नका’; कडू यांचा भिडे यांना इशारा
भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण शांत होतं ना होतं तोच त्यांनी अमरावती भगवा रॅली काढू असे म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापले आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी भगवा रॅली काढू अस भिडे यांनी म्हटलं होतं.
अमरावती, 12 ऑगस्ट 2023 | शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी अमरावतीत एका व्याख्यानात महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण शांत होतं ना होतं तोच त्यांनी अमरावती भगवा रॅली काढू असे म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापले आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी भगवा रॅली काढू अस भिडे यांनी म्हटलं होतं. त्यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देताना, भिडे यांना इशारा दिला आहे. कडू यांनी, भगव्याचा सहारा घेऊन तिरंग्याला डीवचण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. नाही तर त्यांना भोगावे ते लागेल. भिडे यांनी राष्ट्रीय ध्वज तिरंगाचा अवमान करू नये त्यामुळे असंख्य हिंदूवर संशयाची सुई निर्माण होईल असंही त्यांनी सांगितले.
Published on: Aug 12, 2023 09:34 AM