‘मणिपूरवर चकार शब्द ही बोलत नाहीत हा आहे अहंकार’; मोदी यांच्या त्या टीकेला काँग्रेस नेत्याचं खरमरीत उत्तर
त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच त्यांनी विरोधकांची इंडिया ही अहंकाराची आहे. अहंकारी लोकांची युती असल्याची टीका केली होती. त्यावरून कालच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पलटवार केला होता.
मुंबई, 9 ऑगस्ट 2023 । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास ठरावाच्या आधी एनडीएची काल बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच त्यांनी विरोधकांची इंडिया ही अहंकाराची आहे. अहंकारी लोकांची युती असल्याची टीका केली होती. त्यावरून कालच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पलटवार केला होता. तर आज काँग्रेस नेते आमदार भाई जगताप यांनी देखील पलटवार केला आहे. तर पंतप्रधान मोदी यांचा अंहकार हा जनतेच्या मणिपूरच्या घटनेवरून समोर येत आहे. तर देशाच्या मुलींवर मणिपूरमध्ये अन्याय अत्याचार होत असतानाही तेथे मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेतला जात नाही. तर यावर एक चकार शब्द देखील मोदी बोलत नाहीत. हाच अहंकार आहे असा घणाघात जगताप यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या त्या टीकेवर केला आहे.
Published on: Aug 09, 2023 10:44 AM