तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा किंवा नका म्हणू : भुजबळ

| Updated on: Jan 05, 2023 | 2:10 PM

पवारांना दिलेली पदवी आम्हाला मान्य आहे. तर जो जनतेचे प्रश्न सोडवतो, त्याला जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे ? आम्ही म्हणतो. तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा किंवा नका म्हणू, असं भुजबळ म्हणाले.

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर चांगलच राजकीय वारावरण तापलं. त्यानंतर शरद पवार यांना राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते शरद पवार यांना ‘जानता राजा’ म्हणतात. या उपाधीवरून आता राजकारण सुरू आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे.

यावेळी भुजबळ यांनी शरद पवार यांना ‘जानता राजा’ का म्हणू नये असा सवाल केला आहे. तसेच पवार यांनी लोकांचे प्रश्न जाणनू घेऊन ते सोडवले. ते लोकांच्यात मिसळले. मग त्यांना जानता राजा म्हटलं तर त्यात काय चूक असेही ते म्हणाले.

तसेच भुजबळ यांनी, पवारांना दिलेली पदवी आम्हाला मान्य आहे. तर जो जनतेचे प्रश्न सोडवतो, त्याला जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे ? आम्ही म्हणतो. तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा किंवा नका म्हणू, असं भुजबळ म्हणाले.

Published on: Jan 05, 2023 02:10 PM
नवीन वर्षाची दमदार सुरुवात, वर्षाच्या पहिल्या टीआरपीमध्ये टीव्ही 9 मराठी नंबर वन!
अजित पवारांबाबत भाजपनं राजकारण केलं : रोहित पवार