आमदार अपात्र प्रकरणात जुलै महिन्यात सुप्रीम कोर्टात मोठ्या घडामोडी, वकीलांचे काय म्हणणे ?

| Updated on: Jul 06, 2024 | 11:35 PM

सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज येत्या सोमवारपासून सुरु होत आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रातील सर्व प्रकरणांचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणूका आहेत. त्यामुळे निकाल आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या आधी येतो की नंतर येतो याकडे लक्ष लागले आहे.

Follow us on

सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या संपत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाचे रितसर काम सोमवारपासून सुरु होत आहे. या महिन्यात महाराष्ट्रासंदर्भातील तीन ते चार महत्वाच्या सुनावण्या होणार आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी होणार आहे. त्यात दीड वर्षे निकाल प्रलंबित आहे.आता आपल्याला समजणार आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरे यांना परत मिळणार आहे का ? एकनाथ शिंदे यांच्याकडे ते राहणार याचा फैसला होणार आहे की परत हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येईल यावर निकाल होणार असल्याचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटले आहे. आताही वेळ आली आहे की यावर लवकरात लवकर निकाल होणार आहे. परंतू हा निर्णय किती वेळेत होतो ? तो निवडणूकीच्या आधी होतो की नंतर हे आपल्याला सांगता येणार नाही. शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणात भरत गोगावले एकनाथ शिंदे यांच्यावतीने हायकोर्टात गेलेले आहेत. तर उद्धव ठाकरे हे सुनील प्रभू यांच्या मार्फत सुप्रीम कोर्टात आले आहेत. आता सुप्रीम कोर्ट ठरविणार हे प्रकरण नक्की कुठे चालणार आहे. जर हायकोर्टात हे प्रकरण पुन्हा गेले तर खूप वेळ लागू शकतो. सुप्रीम कोर्टात याचा निकाल अपेक्षित आहे. राष्ट्रवादीचाही पक्ष आणि चिन्हाची शरद पवार यांची याचिकेच्या सुनावणीवर अजित पवार यांना उत्तर द्यायचे आहे. परंतू त्यांनी अद्याप रिप्लाय फाईल केलेला नाही. यावर ही 16 जुलै रोजी निकाल अपेक्षित असल्याचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील सर्व प्रकरणाचा निकाल येणार आहे. तो महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या आधी येतो की नंतर येतो याकडे लक्ष लागले आहे. ओबीसी आरक्षणावरुन स्थानिय स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांच्या बाबतही निकाल होणार आहे. परंतू विधानसभा निवडणूकीच्या आधी स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होतील असे वाटत नाही. परंतू यातही सर्वोच्च न्यायालय मार्गदर्शन करु शकते महाराष्ट्र विधानसभेची टर्म 11 नोव्हेंबरला संपणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नोव्हेंबरमध्ये निवृत्त होत आहेत त्यामळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर निकाल अपेक्षित असल्याचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटले आहे.