VIDEO |‘18 वर्ष मंत्री होते, तरी…’; ‘त्या करकर’ टीकेवर जितेंद्र आव्हाड यांचा पलटवार
कोल्हापुरात शरद पवार गटाची निर्धार सभा पार पडली. ऐतिहासिक दसरा चौकात शरद पवार यांची अजित पवार गटावर तोफ डागली आणि इतरांनी देखील मंत्री हसन मुश्रीफ यांचा समाचार घेतला होता. त्यावरून मुश्रीफ यांनी देखली पलटवार केला होता.
कोल्हापूर : 26 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये निर्धार सभा घेतली. ऐतिहासिक दसरा चौकात घेतलेल्या सभेत शरद पवार गटातील माजी मंत्री आमदार जिंतेद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यास मुश्रीफ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होते.
निर्धार सभेत आव्हाडांच्या कोल्हापूरी चप्पलला मुश्रीफ यांनी ते ज्युनिअर आहेत. तर येथे कोल्हापुरी नाही तर कापशी प्रसिद्ध आहे. जे करकर वाजतं आणि पडलं की कळतं असा टोला लगावला होता. त्यावरून आता आव्हाड यांनी पलटवार करत मुश्रीफ यांच्या १८ वर्षांच्या राजकीय आणि मंत्री पदाच्या कारकिर्दीचाच समाचार घेतला आहे.
आव्हाड यांनी कोल्हापुरात यावरून टोला लगावताना, मी नक्कीच त्यांचा ज्युनिअर आहे. पण १८ वर्ष सत्ता, मंत्रीपद भोगणाऱ्यांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात काय केलं असा सवाल मुश्रिफांना केला आहे. तर मुश्रिफांचे असं बोलने हे हास्यास्पद असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.