Jitendra Awhad | छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते : जितेंद्र आव्हाड
आव्हाड यांनी, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते. म्हणजेच धर्मरक्षक होते म्हणजेच ते धर्मवीर होते असं म्हटलं आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याला भोसलेंच राज्य असं म्हटलं जात नाही तर रयतेचं राज्य म्हटलं जात असेही त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई : छत्रपती संभाजीराजेंबाबत अजित पवारांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यांच्यावर टीकेची झोड उडाली. त्याचबरोबर त्यांच्याविरोधात आंदोलने देखिल केली जात आहेत. यादरम्यान त्यांची पाठराखण आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. पण हे करत असताना त्यांनी देखिल वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे आता त्यांच्यावर देखिल टीका होत आहे.
आव्हाड यांनी औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता असं वक्तव्य केलं, त्यामुळे आता आव्हाडांना घेरण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करताना, छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच होते असे म्हटलं आहे.
यावेळी आव्हाड यांनी, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते. म्हणजेच धर्मरक्षक होते म्हणजेच ते धर्मवीर होते असं म्हटलं आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याला भोसलेंच राज्य असं म्हटलं जात नाही तर रयतेचं राज्य म्हटलं जात असेही त्यांनी म्हटलं आहे.