तो तसा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं: जितेंद्र आव्हाड

| Updated on: Jan 02, 2023 | 6:15 PM

मग त्यावेळी औरंगजेब ते मंदिर ही तोडू शकला असता पण त्यांने तसे केले नाही त्यामुळे तो हिंदूद्वेष्टा आणि क्रूर नव्हता

राज्यातील राजकीय वातावरण हे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यामुळे तापलेलं असतानाच आता आणखी एका वादग्रस्त विधानाची भर पडली आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते,’ असे वादग्रस्त वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य करत राळ उडवून दिली आहे

आव्हाड यांनी औरंगजेब हा क्रूर आणि हिंदूद्वेष्ठा नव्हता असं म्हटलं आहे. त्याचबरोबर औरंगजेब हा जर क्रूर आणि हिंदूद्वेष्ठा असता तर त्यानं विष्णू मंदिरही तोडले असतं असं विधान केलं आहे. आता त्यांच्या या वक्तव्याविरोधात राज्यभरातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

“छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब जेव्हा बहादूर गडावर घेऊन गेला आणि महाराजांचे डोळे औरंगजेबाने काढले तेंव्हा तिथेच गडावर विष्णूचं मंदिर होते. मग त्यावेळी औरंगजेब ते मंदिर ही तोडू शकला असता पण त्यांने तसे केले नाही त्यामुळे तो हिंदूद्वेष्टा आणि क्रूर नव्हता, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

Published on: Jan 02, 2023 06:15 PM
Girish Mahajan on Khadse : एकनाथ खडसेंनी स्वप्न बघायला काय हरकत आहे? आणा तुमचं सरकार आणि व्हा मंत्री
काय होईल जेंव्हा भाजपचे 144 आमदार झाले तर; शिंदे गट काय धुणीभांडी करणार? संजय राऊतांचा थेट सवाल