MLA Mukta Tilak: कर्करोगाच्या आजराशी झुंज तरीही आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी पोहचल्या
पक्षाचा आदेश मानने एका कार्यकर्त्या म्हणून माझी जबाबदारी आहे. पक्षाच्या प्रत्येका कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश हा पाळलाच पाहिजे असे मत त्यांनी मुंबईला निघताना व्यक्त केले होते.
पुणे – भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak)कर्करोगाच्या आजराशी झुंज देत आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे तब्येत खालावली असतानाही आमदार टिळक या राज्यसभेच्या मतदानासाठी(Rajya Sabha polls) मुंबईमध्ये दाखल झाल्या आहेत. मतदानाच्या तीन दिवस आधीच मुक्ता टिळक मुंबई आल्या होत्या. पक्षाचा आदेश मानने एका कार्यकर्त्या म्हणून माझी जबाबदारी आहे. पक्षाच्या प्रत्येका कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश हा पाळलाच पाहिजे असे मत त्यांनी मुंबईला निघताना व्यक्त केले होते. आज मतदानाच्या(voter) दिवशी मतदान स्थळावर रुग्णवाहिकेतून त्यांना आणण्यात आले होते. त्यानंतर आमदार मुक्ता टिळक यांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला. अत्यंत चुरशीच्या होत असलेल्या या लढतीमुळे प्रत्येक मताकडे अत्यंत महत्त्वपूर्ण दृष्टिकोनातून पाहिले जात आहेत.
Published on: Jun 10, 2022 12:25 PM