‘उबाठा तर विलीन होणारच!’ भाजप नेत्यानं तारीख सांगत केला राऊत यांच्यावर दावा; म्हणाला, ‘100 कोटींची ऑफर’

| Updated on: May 31, 2023 | 1:38 PM

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधत टीका केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेलं वक्तव्य 100 टक्के खरे असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून नितेश राणे यांनी पुन्हा एकदा राऊत यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी होत आहे. आज ही राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधत टीका केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेलं वक्तव्य 100 टक्के खरे असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून नितेश राणे यांनी पुन्हा एकदा राऊत यांच्यावर टीका केली आहे. तसेच येत्या 19 जूनला उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उबाठा शिवसेना विलीन करणार असा दावा राणे यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे गट हे अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होतोय असेही म्हटलं आहे. तर राऊत यांच्यांवर आरोप करताना त्यांनी 200 कोटींसाठी महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेतला. तर आता ठाकरे गट राष्ट्रवादीत विलिनकरण्यासाठी त्यांना 100 कोटींची ऑफर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव वापरण्याचा अधिकार नाही असेही ते म्हणालेत.

Published on: May 31, 2023 01:38 PM
“राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कोणी लागू नये”, रोहित पवार यांचा इशारा; “राम शिंदे यांनी…”
इंद्रायणी फेसाळली, रसायनयुक्त पाण्यामुळे नागरिकांचा आरोग्यावर प्रश्नचिन्ह