‘मुख्यमंत्री कोण?’ होणार याची फडणवीस यांना माहितीच नव्हती,’ ठाकरे गटाचा मोठा गौप्यस्फोट
शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेदरम्यान मुख्यमंत्री पदावरून काय झालं यावरूनही पडदा उठवताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार नितीश देशमुख यांनी, फडणवीस सांगतात की, मुख्यमंत्रीपदासाठी मी एकनाथ शिंदेंचं नाव सुचवलं होतं.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचा ‘आवाज कुणाचा’ हा पॉडकास्टप्रसारित करण्यात आला. यातून ठाकरे गटाच्या एका मोठ्या नेत्याने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबत मोठा खुलासा केला आहे. तसेच यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेदरम्यान मुख्यमंत्री पदावरून काय झालं यावरूनही पडदा उठवताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार नितीश देशमुख यांनी, फडणवीस सांगतात की, मुख्यमंत्रीपदासाठी मी एकनाथ शिंदेंचं नाव सुचवलं होतं. मात्र हे सपशेल चुकीचं आहे. कारण सत्तांतर होण्याआधीच एक महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, याची आम्हाला माहिती होती. देवेंद्र फडणवीसांना याची माहिती नसेल. पण, स्वत: शिंदेंनी याबाबत आपल्याला माहिती दिली होती. तर फडणवीसांना सरकार पाडायचं एवढेच माहिती होतं. मुख्यमंत्री कोण होणार? याची माहिती त्यांना नव्हती. अमित शाह आणि शिंदे यांनी ते ठरवलं होतं असंही देशमुख यांनी सांगितलं.