‘….म्हणून दुर्घटना होतात’, मनसे आमदार राजू पाटील स्पष्टच बोलले
पुलाचे काम सुरू असताना गर्डर कोसळला. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीरित्या जखमी झाले. जखमींवर शहापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. तर आणखी काही लोक अडकल्याची भीती वर्तवली जाती होती.
ठाणे, 02 ऑगस्ट 2023 | समृद्धी महामार्गावरील (Samrudhi Highway Accident) शहापूरच्या सरलांगे गावामध्ये काल मंगळवारी मोठी मोठी भीषण दुर्घटना झाली. येथे पुलाचे काम सुरू असताना गर्डर कोसळला. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीरित्या जखमी झाले. जखमींवर शहापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. तर आणखी काही लोक अडकल्याची भीती वर्तवली जाती होती. याचदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे आमदार राजू पाटील यांनी सरकारला प्रश्न केला आहे. तसेच त्यांनी ट्विट करत यावरून सरकारवर बोचरी टीका केली होती. यावेळी राजू पाटील यांनी, चूक कुणाची? भूक कुणाची? असा सवाल सरकारला केला होता. रक्तरंजित ‘समृध्दी’ किती बळी घेणार? मृतांच्या कुटूंबियांना ५-५ लाख देऊन जबाबदारी झटकता येणार नाही. हे वारंवार का होतंय याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती. तसेच पुरेशी काळजी न घेतल्याने झालेल्या ह्या दुर्घटनेचा निषेध. मृत्यू पावलेल्या कामगारांना भावपूर्ण श्रध्दांजली असे म्हटलं होतं. तर अशी दुर्घटना टाळण्यासाठी एक एसओपी बनवावी अशीही मागणी त्यांनी केली.