Ravi Rana On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या आमदारांवर विश्वास आहे का?
अपक्ष आमदार आशीष जयस्वाल यांनी मंत्र्यांना टक्केवारी द्यावे लागते हे केलेलं वक्तव्य प्रत्येकाच्या ओठावर आहे. जशी अपक्ष आमदार नाराज आहे तसे शिवसेनेचे आमदार नाराज आहे ते मोठा झटका उद्धव ठाकरेंना देतील, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे.
अमरावती : राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या आमदारांवर विश्वास आहे का? शिवसेनेचे आमदारांनाही हॉटेलमध्ये शिवसेनेच्या देखरेखीखाली ठेवावे लागते. शिवसेनेचे आमदार आपल्या सोबत आहे की नाही असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पडला आहे. अपक्ष आमदार आशीष जयस्वाल यांनी मंत्र्यांना टक्केवारी द्यावे लागते हे केलेलं वक्तव्य प्रत्येकाच्या ओठावर आहे. जशी अपक्ष आमदार नाराज आहे तसे शिवसेनेचे आमदार नाराज आहे ते मोठा झटका उद्धव ठाकरेंना देतील, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे.
Published on: Jun 07, 2022 01:42 AM