कडू ”त्या” दाव्यावर आमदार रवी राणा यांचा पलटवार; म्हणाले… ‘कोण कोणा…’
आगामी लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून वादाची ठिणगी पडल्याचेही दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 22 जागांवर दावा केल्याने युतीत डोकेदुखी वाढली आहे. याचदरम्यान मंत्री पदाचा दर्जा मिळताच प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत राजकीय खेळी खेळली आहे. त्यांनी थेट अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या मतदारसंघावर दावा सांगितला आहे.
नागपूर : राज्यातील मंत्री मंडळ विस्तारावरून सध्या युतीत रस्सीखेच होताना दिसत आहे. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून वादाची ठिणगी पडल्याचेही दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 22 जागांवर दावा केल्याने युतीत डोकेदुखी वाढली आहे. याचदरम्यान मंत्री पदाचा दर्जा मिळताच प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत राजकीय खेळी खेळली आहे. त्यांनी थेट अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. आम्ही अमरावती मतदारसंघातून लढणार आहोत. या मतदारसंघावर आम्ही फोकस केला आहे. भाजप-शिंदे गटाच्या युतीत आम्हाला ही जागा नाही मिळाली तर आम्ही स्वबळावर लढू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यावरून आता नवनीत राणा यांच्यासह शिंदे-फडणवीस यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. याचदरम्यान बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी जोरदार पलवार करताना कडू यांचा दावाच खोडून काढला आहे. त्यांनी, देशामध्ये मोदीजींची सरकार आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस प्रमुख आहेत. तर आमची आणि खासदार नवनीत राणा यांची अमित शाह यांच्याशी याच्यावर अनेकदा बोलणं झालं आहे. तर फडणीस सुद्धा आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे कोण कोणासाठी जागा मागतो याचा निर्णय पंतप्रधान मोदी, शाह आणि फडणीस घेतील. त्यामुळे कोणीही किती जरी दावे केले तर ते दावे आम्ही खोडून काढू.