‘भरती प्रक्रियेत अनेक एजंटांचा सुळसुळाट’; रोहित पवार यांची रोखठोक टीका
त्याचदरम्यान वनविभागातील भरतीच्या पेपर फुटीची घटना उघडकीस आली आणि रँकेटचा पर्दा फार्श झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.
मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | काही दिवसांपासून वनविभागाच्या भरतीत घोटाळ्याच्या बतम्या येत होत्या. त्याचदरम्यान वनविभागातील भरतीच्या पेपर फुटीची घटना उघडकीस आली आणि रँकेटचा पर्दा फार्श झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी, वनविभागाच्या परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्या कडून 1000 परीक्षा शुल्क घेण्यात आले. मात्र छत्रपती संभाजी नगर याठिकाणी पेपर फूटला. तेथे मास कॉपी करताना विद्यार्थी पाहायला मिळाले अशा वारंवार घटना देखील होत आहेत. तर टीसीएस सारख्या कंपनीला या सगळ्या संदर्भामध्ये सरकारकडून पैसे दिले जातात. मात्र परीक्षा केंद्र कॉपी होत असताना सरकार या विषयी गंभीर नाही का? एखाद्या सेंटरवर अशा पद्धतीने कॉपी होत असेल तर दुसऱ्या सेंटरवरच्या मुलांवर अन्याय होताना पाहायला दिसून येत आहे. तर भाजप प्रणित असणाऱ्या राज्यांमध्ये उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये भाजपचे पदाधिकारी क्लास घेतात त्या ठिकाणचे विद्यार्थी पास होतात बाकीचे विद्यार्थी पास होत का नाहीत असे देखील निदर्शनास आले आहे. त्यामुळे युवकांचा बाजार उठवून ठेवलाय अस दिसून येत असल्याची टीका यावेळी रोहित पवार यांनी केली आहे.