MIDC प्रकरण तापणार? रोहित पवार यांचा उद्योगमंत्र्यांसह शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना इशारा

| Updated on: Aug 09, 2023 | 8:34 AM

तर याचप्रश्नावरून त्यांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून भर पावसात आंदोलन केले होते. त्यानंतर एमआयडीसी प्रश्नावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा प्रश्न लवकरच सोडवू असे आश्वासन दिलं होतं.

अहमदनगर, 9 ऑगस्ट 2023 । कर्जत जामखेड विधानसभचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या मतदार संघातील कर्जत MIDCवरून सरकारला चांगलेच घेरलं होतं. तर याचप्रश्नावरून त्यांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून भर पावसात आंदोलन केले होते. त्यानंतर एमआयडीसी प्रश्नावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा प्रश्न लवकरच सोडवू असे आश्वासन दिलं होतं. तसेच याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक घेऊन निर्णय घेऊ असेही त्यांनी म्हटलं होतं. पण आता अधिवेशन संपलं असून अजूही यावर कोणतीही बैठक झालेली नाही. यावरून पुन्हा एकदा रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर याबाबत सामंत यांनी कोणतंच आश्वासन दिलेलं नाही. तर यावरून आता आम्ही वेगळी भूमिका घेणार असून महाराष्ट्रातील आधीचे दोन इंजिन आणि आताचे एक इंजिन जर ऐकत नसतील तर मोठ्या इंजिनकडे जाऊ. मोठं इंजिन म्हणजे केंद्राकडे जाऊ असा इशारा दिला आहे.

Published on: Aug 09, 2023 08:34 AM
एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांच्याकडून शिवसेनेचा उल्लेख; म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी युती…”
‘झुकेगा नही साला…’, अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झळकले पोस्टर, बच्चू कडू यांचा आज एल्गार!