video : आठ दिवस थांबा, बघा शिवसेनेच काय होतयं : संजय शिरसाट
शिरसाट यांनी संजय राऊत यांचा भोंगा असा उल्लेख करत या भोंग्यामुळेच शिवसेना रिकामी होणार असल्याचेही सांगितलं. इतकच काय तर येणारी निवडणूकीत काय करायचा हा प्रश्न देखिल पडणार आहे.
औरंगाबादः उद्धव ठाकरे गटासाठी टेन्शन वाढवणारे विधान शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यावरून सध्या राज्यात जोरदार चर्चांना उत आला आहे. संजय शिरसाट यांनी ८ ते १० दिवसात ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे रिकामी होणार, असा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पदार्पण करतील असा दावा देखिल यावेळी शिरसाट यांनी केला आहे
शिरसाट यांनी संजय राऊत यांचा भोंगा असा उल्लेख करत या भोंग्यामुळेच शिवसेना रिकामी होणार असल्याचेही सांगितलं. इतकच काय तर येणारी निवडणूकीत काय करायचा हा प्रश्न देखिल पडणार आहे.
यादरम्यान ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. येथील मोठ्या संख्येने नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात आले. त्यानंतरच राऊत तातडीने नाशिक दौऱ्यावर गेले.