औरंगजेबची कबर हैदराबादला हलवली तर ती ओवेसीला जरा जवळची पडेल, संजय शिरसाट यांचा घणाघात

| Updated on: Mar 06, 2023 | 4:07 PM

औरंगजेबची कबर येथून हटवावी आणि ती हैद्राबादला हलवावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्या कडे करणार असल्याचे शिवसेना (शिंदे गट) नेते आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.

मुंबई : औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर एमआयएमच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे. याचदरम्यान तेथे बिर्याणीच्या पंगत्या उठत आहेत. तर एमआयएमच्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेथे उपोषणस्थळी औरंगजेबचा फोटो झळकवला जात आहे. यावरून आता टीका होताना दिसत आहे. याचवेळी ही कबर येथून हटवावी आणि ती हैद्राबादला हलवावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्या कडे करणार असल्याचे शिवसेना (शिंदे गट) नेते आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. तर याच मागणीसाठी शिरसाट आणि जयस्वाल यांनी पोलिस आयुक्तांची भेट देखिल घेतली आहे. याचवेळी शहरात जातीवाद परविण्यासाठीच एमआयएम जन्म झाला असेही टीका शिरसाट यांनी केली आहे.

Published on: Mar 06, 2023 04:07 PM
राज्यात सत्तेत असताना पंतप्रधान यांच्याकडे कसली मागणी करता? कबरीवरून जलील यांचा टोला
रामदास कदम हे गोळवलकर आणि हेडगेवार यांच्या विचारांचे गुलाम, कुणी केली सडकून टीका?