‘खरं तर त्यांना इतिहासच माहितीच नाही’; उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ वक्व्यावरून शिवसेना नेता भडकला
यावेळी माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. तर औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टीका केली होती.
मुंबई, 07 ऑगस्ट, 2023 | शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांचा काल संयुक्त मेळावा पार पडला. हा मुंबईच्या रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. तर औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टीका केली होती. ठाकरे यांनी शिवसेना फोडणारा औरंग्या असे शिंदे यांना म्हटलं होतं. त्यावरून आता शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी शिरसाट यांनी, आता ठाकरे यांनी इतिहास खूपच आठवत आहे. अफझलखान, औरंग्या आणखीन काय काय? पण खरतर यांना इतिहास माहितच नाही अशी घणाघाती टीका केली आहे.
Published on: Aug 07, 2023 12:49 PM