आमदाराची पोलीस निरीक्षकाला सस्पेंड करण्याची धमकी, कारण अगदीच शुल्लक

| Updated on: Sep 27, 2023 | 8:05 PM

पोलिसांनी नाका तपासणीत एक दुचाकी पकडली. ती माजी नगरसेवकाची होती. पोलिसांनी त्यांना जुमानल नाही. दुचाकी पोलीस स्टेशनला नेली. त्यावरून आमदाराने पोलिसांना फोन केला. पण...

नांदेड : 27 सप्टेंबर 2023 | नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात पोलिसांनी रोड रोमियो आणि चोरीच्या दुचाकीबाबत कारवाई सुरु केलीय. याच कारवाई दरम्यान विना नंबरची एक दुचाकी पोलिसांनी अडवली. ही दुचाकी एका माजी एका माजी नगरसेवकाची होती. पण, पोलिसांनी त्यांना न जुमानता ती दुचाकी पोलीस ठाण्यात नेली. नगरसेवकाने आमदाराला फोन लावला. आमदाराने पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला फोन केला. मात्र, त्यांनी दुचाकी सोडण्यास नकार दिला त्यामुळे आमदार संतापले. दुचाकी सोडा नाही तर सस्पेंड करतो अशी धमकीच आमदारांनी दिली. इतक्यावरच ते थांबले नाही. अधिवेशनात तारांकीत प्रश्न विचारू, तुमच्यावर कारवाई करू अशी धमकीही दिली. मात्र, पोलिसांनीही कडक भूमिका घेत स्टेशन डायरीमध्ये या प्रकाराची नोंद केली. शेकाप आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्याविरोधात पोलिसांनी ही कडक भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालीय.

Published on: Sep 27, 2023 07:29 PM