भिडे यांच्या वक्तव्याविरोधात यशोमती ठाकूर आक्रमक; थेट देशातून हद्दपार करण्याची केली मागणी
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना अक्षेपाहार्य वक्तव्य केलं होतं. त्यांनी गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असून करमचंद गांधी त्यांचे त्यांचे खरे वडील नाहीत. तर एक मुस्लीम जमीनदार त्यांचे वडिल आहेत अशी गरळ ओकली होती
आमरावती, 29 जुलै 2023 | शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना अक्षेपाहार्य वक्तव्य केलं होतं. त्यांनी गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असून करमचंद गांधी त्यांचे त्यांचे खरे वडील नाहीत. तर एक मुस्लीम जमीनदार त्यांचे वडिल आहेत अशी गरळ ओकली होती. त्यानंतर आता राज्यातील तापमान वाढलं आहे. तर काँग्रेसने या विरोधात आता आक्रमक भूमिका घेतली आहे. भिडे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या ॲड. आमदार यशोमती ठाकूर यांनी याच्याआधीच टीका केली होती. त्यांनी, भिडे त्यांच्यावर सरकार कोणतीच कारवाई का करत नाही. भिडेंचा बोलविता धनी कोण? त्यांना अभय कुणाचे? असा सवाल केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा यशोमती ठाकूर यांनी भिडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेस करणार संभाजी भिंडे विरोधात तीव्र आंदोलन करणार आहे. तर त्याच्याआधी भिडे यांना अटक करण्याची मागणी करताना, भिडे यांना महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून हद्दपार केलं पाहिजे असं म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी भिडे यांच्या त्यावरून आणखी काय टीका केली आहे ते पाहा…