आमदार निवासाच्या बदल्यात आमदारांना अव्वाच्या सव्वा भाडे, तरी म्हणतायेत भाडे वाढवा

| Updated on: Sep 29, 2022 | 11:14 AM

तीन वर्षांपासून आमदार निवासाचं काम रखडलं आहे. त्यामुळे विधीमंडळावर कोट्यावधीचा बोजा पडत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई : तीन वर्षांपासून आमदार (MLA) निवासाचं काम रखडलं आहे. त्यामुळे विधीमंडळावर कोट्यावधीचा बोजा पडत असल्याचं समोर आलं आहे. आमदार निवासाचं काम रखडल्यामुळे आमदारांना घरं अपलब्ध होत नाहीयेत, त्यामुळे आमदारांना भाड्यापोटी (Rent) दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागत आहेत. हा सर्व खर्च सरकारी तिजोरीमधून होत असल्याने, वर्षाकाठी विधीमंडळावर जवळपास 15 कोटींचा बोजा पडत असल्याचं समोर आलं आहे.  तीन वर्षांपूर्वी आमदार निवासाचं काम सुरू झालं, मात्र अद्यापही ते पूर्ण झालेलं नाही. तीन वर्षांपासू काम रखडल्याने आमदारांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना भाड्यासाठी दर महिन्याला एक लाख रुपये देण्यात येतात. त्यामुळे वर्षाकाठी  जवळपास 15 कोटींचा बोजा विधीमंडळावर पडत आहे. एकीकडे भाड्यासाठी विधीमंडळावर कोट्यवधीचा बोजा पडत असताना दुसरीकडे भाड्यात आणखी वाढ करण्याची मागणी आमदारांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

 

 

Published on: Sep 29, 2022 11:14 AM