अपात्र आमदार प्रकरणात नार्वेकर यांचा मोठा निर्णय; नोटिसा बजावण्यासह घेतला ‘हा’ निर्णय

| Updated on: Jul 09, 2023 | 2:05 PM

त्यानंतर त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्ता स्थापन केली होती. या घटनेनं अख्य राज्य धक्क्यात होतं. तर या धक्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं.

मुंबई : राज्याच्या 1 वर्षाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देत 40 आमदारांसह बंड केलं होतं. त्यानंतर त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्ता स्थापन केली होती. या घटनेनं अख्य राज्य धक्क्यात होतं. तर या धक्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं. तर आत्ताही याच प्रकरणी ठाकरे गटाकडून आमदार सुनिल प्रभू यांनी पुन्हा सर्वेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचदरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 15 आमदार आणि उद्धव ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्रता प्रकरणात नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर यात आता मोठा दुसरा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत नार्वेकर यांनी, जर आमदारांना लेखी उत्तरे देता आलं नाही. तर त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून म्हण मांडता येणार आहे. त्यामुळे आता शिंदे गटासह ठाकरे गटाचे आमदार काय करतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Published on: Jul 09, 2023 02:05 PM
“देश बुडव्यांच्या हाती महाराष्ट्र, राज्य सरकार बरखास्त करा”, संजय राऊत यांची टीका
ठाकरेंच्या पोस्टरवर ‘धर्माभिमानी’ उल्लेख, महंत सुनील महाराज म्हणतात, “खरे हिंदुत्ववादी उद्धव ठाकरेच”