राज्यपाल येताच शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावर आमदारांची घोषणाबाजी

| Updated on: Mar 03, 2022 | 12:35 PM

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना महाविकास आघाडीच्या संतापाला सामोरे जावे लागले.

मुंबईः विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना महाविकास आघाडीच्या संतापाला सामोरे जावे लागले. राज्यपालांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे त्यांनी अभिभाषणाच्या प्रथेला फाटा देत थेट विधिमंडळ सोडून सभागृहातून काढता पाय घेतला. राज्यपाल राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत, अशी खंत यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली. मात्र, राज्यपाल राष्ट्रगीतावेळी उपस्थित होते. एकीकडे महाविकास आघाडीतील पक्षांनी राज्यपालाविरोधात आंदोलन तीव्र केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) राज्यपाल हटाव, अशी मागणी केली आहे. येणाऱ्या काळात हा कलगीतुरा रंगणार आहे.

संजय दौंड यांनी खरोखरच खाली डोकं वर पाय केलं, राज्यपालांच्या विरोधात निषेधासन
नांदेडमध्ये उन्हाळी ज्वारीच्या पिकात चांगली वाढ