युवासेनेच्या पदाधिकाऱ्यावर मनसेचा आरोप, थेट ईडीलाच पाठवले पत्र
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते यांना सोमय्या यांनी तुरुंगवारीही घडवून आणली. भाजप पाठोपाठ आता मनसेनेही शिवसेनेची अंगीकृत संघटना युवासेनेला आपले लक्ष्य केले आहे.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या ( kirit somaiya ) यांनी भ्रष्टाचार, घोटाळ्याच्या मुद्यावरून शिवसेना ( shivsena ) आणि राष्ट्रवादीला ( ncp ) अडचणीत आणले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते यांना सोमय्या यांनी तुरुंगवारीही घडवून आणली. भाजप पाठोपाठ आता मनसेनेही शिवसेनेची अंगीकृत संघटना युवासेनेला आपले लक्ष्य केले आहे.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यांनी ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र पाठवले आहे. यात कोरोना काळात युवासेनेच्या एका पदाधिकाऱ्याने फार मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पदाधिकाऱ्याला कंत्राट देण्यात आले असून त्यात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे त्याला दिलेल्या कंत्राटाची आणि त्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी विनंती संदीप देशपांडे यांनी ईडीला केली आहे.
Published on: Jan 31, 2023 10:46 AM