भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर

| Updated on: Mar 04, 2024 | 8:55 PM

मुंबई स्वच्छ करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे ही चांगली गोष्ट आहे. मात्र हे काम करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्यात आले आहे. त्याऐवजी हेच काम महाराष्ट्रातील महिला बचत सहकारी संस्थाना देण्यात यावे अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

मुंबई | 4 मार्च 2024 : मनसेने महिला बचत गटांचा आक्रोश मेळावा घेतला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सखोल स्वच्छता अभियानासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. हे टेंडर रद्द करून हेच काम महिला बचत संस्थाना देण्यात यावे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. जवळपास साडे आठशेच्यावर महिला बचत संस्था आहेत. या महिलांनी मुंबईच्या 26 जुलैचा पाऊस असो वा इतर संकटात मुंबई स्वच्छ करण्याचे काम केले आहे. या महिलांना राज साहेबाची भेट घेतली होती म्हणून त्यांचा आज आक्रोश मेळावा घेण्यात आला होता असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले. सध्या कोणाही एकाच स्वबळावर सरकार येईल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे आम्हाला कोणी डोळा मारतंय का? कोणी वेष बदलून येतेय का? कोणी टाळी देतेय का ? याची आम्ही वाट पहातोय. जर कोणीच आले नाही तर आपलं आहेत एकटा जीव सदाशिव अशी प्रतिक्रीया नांदगावकर यांनी दिली आहे.

Published on: Mar 04, 2024 08:50 PM
‘वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण…,’ काय म्हणाल्या अंकिता पाटील-ठाकरे
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर अमोल कोल्हेंचा पलटवार