Raj Thackeray Speech | ‘बाळासाहेबांनी माझ्यासमोर हात पसरले आणि म्हणाले..’-tv9
शिवसेनेतून बाहेर पडतोय हे सांगण्यासाठी मी बाळासाहेबांकडे गेलो होतो. तेव्हा तिथे मनोहर जोशी उपस्थित होते. ते खोलीच्या बाहेर गेले. मी ही बाहेर पडलो होतो. त्यावेळी बाळासाहेबांनी मला परत बोलावलं आणि मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर सडकून टीका देखील केली. तसेच शिवसेना सोडत असताना बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यात झालेल्या एक किस्सा देखिल त्यांनी सांगितला. यावेळी राज ठाकरे म्हणाले, मी दगा फटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलो नाही. तर मी कोणत्याही पक्षातही गेलो नाही. तुमच्या विश्वासावर मी स्वतःचा पक्ष उभा केला. त्यावेळी
मी बाळासाहेबांना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो. शिवसेनेतून बाहेर पडतोय हे सांगण्यासाठी मी बाळासाहेबांकडे गेलो होतो. तेव्हा तिथे मनोहर जोशी उपस्थित होते. ते खोलीच्या बाहेर गेले. मी ही बाहेर पडलो होतो. त्यावेळी बाळासाहेबांनी मला परत बोलावलं आणि मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा.