Raj Thackeray Speech | ‘नुपूर शर्मा ज्या बोलल्या तेच झाकीर नाईक बोलला होता’tv9

| Updated on: Aug 23, 2022 | 5:38 PM

राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं आहे. तसेच त्यांची बाजू घेताना, नुपूर शर्मा ज्या बोलल्या तेच झाकीर नाईक बोलला होता. मात्र झाकीर नाईकवर कोणतीच कारवाई झाली नाही.

मनसेप्रमुख राज ठाकरे हे पुन्हा एकदा अ‍ॅक्टिव्ह झाल्याचे दिसत आहेत. राज ठाकरे यांनी आज रवींद्र नाट्यमंदिर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत ठाकरी शैलीत सध्याच्या चाललेल्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. तसेच राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं आहे. तसेच त्यांची बाजू घेताना, नुपूर शर्मा ज्या बोलल्या तेच झाकीर नाईक बोलला होता. मात्र झाकीर नाईकवर कोणतीच कारवाई झाली नाही. उलट तो आजही बोलतच आहे. तर नुपूर शर्मा या बोलल्या म्हणून त्यांना भाजपने काढून टाकलं. त्यांनी सगळ्यांची माफी मागितली. त्यावेळी मी त्यांची बाजू घेतली असे राज ठाकरे म्हणाले.

 

Published on: Aug 23, 2022 05:38 PM
Raj Thackeray Speech | ‘बाळासाहेबांनी माझ्यासमोर हात पसरले आणि म्हणाले..’-tv9
Ajit pawar | Vidhansabha | मंत्री अनुपस्थित, दादा भडकले, पुढं काय घडलं पाहा !