Video| आव्हाड यांचा ट्विटरवर राजीनामा; राज ठाकरेंची मनसे म्हणते बालदिनाच्या…

| Updated on: Nov 14, 2022 | 2:08 PM

राज ठाकरे यांच्या मनसेने जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला आहे.

मुंबईः जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण (Maharashtra Politics) चांगलंच तापलं आहे. खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी सकाळी सकाळी ट्विट करून ही लोकशाहीची हत्या असून आमदारकीचा राजीनामा (Resignation) देणार असल्याचं ट्विट केलंय. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते त्यांची मनधरणी करत आहेत. यावरून राज ठाकरे यांच्या मनसेने जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला आहे. ट्विटरवरून राजीनामा देणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना बालदिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. तसेच हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आठ दिवसांनी जितेंद्र आव्हाड यांनी त्यावरून विरोध करण्यास सुरुवात केली. आठ दिवस त्यांनी काय केलं, असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी केलाय.

Published on: Nov 14, 2022 02:08 PM
एकनाथ शिंदे यांना मोठी ऑफर! म्हणाल्या, ‘राऊत, आव्हाडांविरोधात गुन्हे मागे घ्या, आम्ही तिघी धुमधडाक्यात…’
नेमकं काय केलं आव्हाडांनी? Video शहरभर स्क्रिन लावून दाखवणार, ऋता आव्हाड यांचा निर्धार काय?