पंतप्रधान मोदी येणार आहेत शाळांना सुट्टी द्या; प्रशासनाकडे कोणी केली मागणी?
पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील पुण्यात थांबणार आहेत.
पुणे, 31 जुलै 2023 | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे 1 ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील पुण्यात थांबणार आहेत. तर उद्या अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. त्यातच त्यांच्या हस्ते मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडाही दाखवला जाणार आहे. यासह इतर काही प्रकल्पांचा उद्धघाटन केलं जाणार आहे. त्यामुळे उद्या पुण्यात अनेक राजकीय नेते एकत्र येणार असल्याने पुण्यात जय्यत तयारी केली जात आहे. याचपार्श्वभूमिवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिक्षण आयुक्तांकडे शहरातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेत पंतप्रधान मोदी हे पुण्यात येणार असून पालक आणि विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून शाळांना सुट्टी देण्यात यावी असे म्हटलं आहे.