Raj Thackeray : मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेच खडे; चांद्रयानावरून राज ठाकरे यांचे सरकारला चिमटे

| Updated on: Aug 16, 2023 | 3:50 PM

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आप पनवेलमध्ये शिंदे सरकारवर जोरदार निशाना साधला. यावेळी त्यांनी रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर सरकारवर टीका केली. तर चांद्रयानावरून चिमटे देखील काढले आहेत.

पनवेल : 16 ऑगस्ट 2023 | गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. त्यावरून मनसेकडून आज पनवेल शहरात निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरून सरकारला खडेबोल सुनावले आहेत. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित निर्धार मेळाव्यात बोलताना, आज मी कोणतेही मोठे भाषण करण्यासाठी आलेलो नाही. आज फक्त या आंदोलनास झेंडा दाखवण्यासाठी आलो आहे. तर देशाने पाठवलेले चांद्रयानाचा आपल्याला त्याचा काय उपयोग? चंद्रावर जाऊन खड्ड्यांचाच अभ्यास करायचा आहे. तर मग त्यासाठी चंद्रावर कशाला जायला हवं. ते महाराष्ट्रात सोडलं असतं तर खर्चही वाचला असता, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तर केवळ कोकणचेच नाही तर महाराष्ट्रातील संपुर्ण रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. आपले चांद्रयान जर चंद्रावर जाऊ शकते तर मग येथील रस्ते का चांगले होऊ शकत नाहीत असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

Published on: Aug 16, 2023 03:50 PM
राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी शरद पवार गटाचा नवा प्लान, साहेब की दादा आता NCP चे कार्यकर्तेच ठरवणार
मनसेचा पंजाबी तालुक्याध्यक्ष; राज ठाकरे यांनी भाषणात उल्लेख केलेला ‘तो’ सरदार नेमका आहे कोण?