‘कानाखाली आमचा आवाज पडल्यावरच जाग कशी आली?’, रविंद्र चव्हाण यांना मनसे नेत्याचा खरमरीत सवाल
गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून राज्यातील खराब रस्त्यांवरून आक्रमक भूमिका घेतली जाथ आहे. मनसेकडून अनेक टोल नाक्यांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. त्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पत्र लिहीत थेट मनसेलाच सवाल केले आहेत.
मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्रातील अनेक महामार्गावरील रस्ते हे पुर्ण खराब झाले आहेत. त्यावर फक्त खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. तर या खड्ड्यांमुळे जनता त्रस्त झाली आहे. यामुळे आता मनसे आक्रमक झाली असून मनसे कडून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘जागर यात्रा’ काढली जाणार आहे. पण त्याच्याआधी आता मनसेच्या कार्यकर्त्यांकडून टोल नाक्यांची तोडफोड केली जात आहे. यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पत्रातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर त्यांनी दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको. दगड रचून नवा इतिहास रचणारी नवी पिढी हवी असा टोला लगावला होता. त्यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांनी, आम्हाला महाराष्ट्र द्रोही म्हणणाऱ्या, या महाराष्ट्र विरोधी म्हणणाऱ्यांना मला विचारायचे आहे, गेले सतरा वर्ष मुंबई गोवा हायवे ज्याने बनवला नाही. हे महाराष्ट्र प्रेमी? की महाराष्ट्र द्रोही? तिथे पडलेला खड्ड्यामध्ये हजारो लोकांच्या जीव गेला आणि हजारो लोकांच्या खून केला ते महाराष्ट्र द्रोही? का महाराष्ट्र प्रेमी? असा सवाल केला आहे. तर गेली सतरा वर्ष हा रोड रखडलेले आहे. 2014 ते 2019 तुमचं सरकार होतं. त्या वेळेला तुम्ही काय काम केलं? पाच वर्षात काय केलं. जर कोणी काम करायला तयार नसेल तर त्यांची आरती करायचे का? असा ही सवाल त्यांनी केला आहे.