शिवसेना मेळाव्यात संजय राऊतांची खुर्ची रिकामी, तर उद्या… संदीप देशापांडेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

| Updated on: Sep 22, 2022 | 7:53 AM

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी शिवसेना मेळाव्यातील राऊतांच्या खुर्चीवरून उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

मुंबई :  काल मुंबईमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी यावेळी शिंदे गट आणि भाजपावर (BJP) घणाघात केला. मात्र त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी शिवसेना मेळाव्यातील राऊतांच्या खुर्चीवरून उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती, उद्या तुमची पण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल तयारी ठेवा’. असं ट्विट देशपांडे यांनी केलं आहे. यापूर्वी देखील अनेकदा संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. आता शिवसेना देशपांडे यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

 

 

 

Published on: Sep 22, 2022 07:48 AM
दरवाजे मोकळेत म्हणायचं आणि पाठीमागून माणसं पाठवयची!’ उद्धव ठाकरेंवर कुणाचा आरोप?
Mumbai Local : मोठी बातमी! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दादर रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं?