Sandeep Deshpande On Tweet : लोकांचे लक्ष विचलित करण्याचे राजकारण सुरू
उलट नको ते वाद काढायचे, लोकांच्या प्रश्नावर बोलयचं नाही. तर सामान्य माणसाला या प्रश्नांशी काहीच देणं घेणं नाही. तर दुर्दैव म्हणजे माध्यमांमध्येही हीच चर्चा होताना दिसते.
मुंबई : सध्याच्या राज्यातील वादाच्या बाबतीत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. तसेच त्यांनी राज्यातील मुख्य प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अशी विधानं केली जात आहेत. असं राजकारण केलं जात असल्याचं म्हटलं आहे.
त्याचबरोबर या देशाला, राज्याला विकासावर नेणारे अनेक मोठे नेते आहेत. त्यांच्यावर आज बोण्याची देखिल लायकी आहे का हे आधी सर्वांनी तपासायला हवं असेही देशपांडे यांनी म्हटलं आहे.
उलट नको ते वाद काढायचे, लोकांच्या प्रश्नावर बोलयचं नाही. तर सामान्य माणसाला या प्रश्नांशी काहीच देणं घेणं नाही. तर दुर्दैव म्हणजे माध्यमांमध्येही हीच चर्चा होताना दिसते. तर सामान्यांनी प्रश्नच विचारू नयेत यासाठीच हा खटाटोप असल्याची टीका देखिल देशपांडे यांनी केली आहे.
Published on: Jan 04, 2023 03:31 PM