पक्षांतर करण्याच्या Offers 2019 पासून येतायत, पण मी मनसे पक्ष सोडणार नाही -Vasant More

पक्षांतर करण्याच्या Offers 2019 पासून येतायत, पण मी मनसे पक्ष सोडणार नाही -Vasant More

| Updated on: Apr 07, 2022 | 8:21 PM

पुण्यात मनसेची मदार संभाळणारा मनसेचा धाकड नेताच या भूमिकेने नाराज झाल्याने मनसेत मोठा पेच निर्माण झाला होता. पुणे मनसे अध्यक्षपदावरून वसंत मोरे यांना अखेर हाटवण्यात आले आहे. त्यांच्या ठिकाणी पुणे मनसेच्या अध्यक्षपदी साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची नियुक्ती करण्यात आलीय.

पुणे : शनिवारी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशीदीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतल्याने मनसेत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. या भूमिकेबाबत काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला कळेना म्हणत पुण्याचे मनसे अध्यक्ष वसंत मोरे (Mns Vasant More) हे नाराज होते. पुण्यात मनसेची मदार संभाळणारा मनसेचा धाकड नेताच या भूमिकेने नाराज झाल्याने मनसेत मोठा पेच निर्माण झाला होता. पुणे मनसे अध्यक्षपदावरून वसंत मोरे यांना अखेर हाटवण्यात आले आहे. त्यांच्या ठिकाणी पुणे मनसेच्या अध्यक्षपदी साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यानंतरही मी मनसेत राहण्यावर ठाम आहे, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे, इतक्यात तरी मनसे सोडायची इच्छा नाही, त्यामुळे साईनाथ बाबर माझाच कार्यकर्ता आहे, तो अध्यक्ष झाला तरी मला काही अडचण नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.

आम्हाला तुरुंगात टाकतील, ठार मारतील, आमची तयारी मात्र पुढची 25 वर्ष भाजपची सत्ता येणार नाही – Raut
Special Report | शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन, Sanjay Raut यांचा भाजपला इशारा -Tv9