राज ठाकरे लागले पुण्यात पक्ष बांधणीला; आज पुणे दौरा, मोठ्या बदलांची शक्यता

| Updated on: Jun 21, 2023 | 11:44 AM

पुणे लोकसभा पोटनिवडणूक ही लागण्याची शक्यता आहे. त्यावरून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत.

पुणे : राज्यात येत्या वर्षात लोकसभेसह महापालिकांच्या निवडणुकांचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. तर पुणे लोकसभा पोटनिवडणूक ही लागण्याची शक्यता आहे. त्यावरून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. तर त्यांच्याकडून आगामी महापालिका आणि लोकसभेच्या निवडणुकीवरून पक्ष कार्यकारणीत बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे आता पुण्याच्या पक्ष बांधणील्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर ते आज पुण्यात मनसे कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून कार्यकर्त्यांना कोणत्या सुचना करतात याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. ही बैठक पुण्यातील मनसेच्या पक्ष कार्यालयात होणार आहे. तर या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका, पुणे लोकसभा पोटनिवडणूक या निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Published on: Jun 21, 2023 11:44 AM
शिवसेनेच्या बंडाळीला 1 वर्ष पूर्ण; एकनाथ शिंदे यांच्या वडिलांकडून केक कापत ‘स्वाभिमान दिन’ साजरा!
“बुडाला आग लागल्यावर ठाकरे मोर्चा काढत आहेत”, भाजप नेत्याची जहरी टीका