Raj Thackeray | आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, राज ठाकरेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

Raj Thackeray | आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, राज ठाकरेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

| Updated on: May 10, 2022 | 7:23 PM

राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!, असा थेट इशाराच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच इशारा दिला आहे. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!, असा थेट इशाराच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायला ते पाकिस्तानातील अतिरेकी आहेत की हैदराबाद संस्थानातील रझाकार आहेत? असा सवालही राज ठाकरे यांनी या पत्रातून केला आहे.

Published on: May 10, 2022 07:23 PM
Rajesh Tope On Corona Update | कोरोना परिस्थितीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया
रुग्णालयाला अंधारात ठेऊन फोटो काढणे चुकीचे