Raj Thackeray : एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका

| Updated on: Mar 23, 2025 | 4:01 PM

Raj Thackeray On Satish Bhosale : सुरेश धस यांचा कार्यकर्ता आरोपी खोक्या भोसले याच्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत टीका केली आहे.

एक खोक्याभाई काय घेऊन बसलात अख्खी विधानसभा भरलेली आहे, असं राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे. मनसेच्या पदाधिकारी बैठकीत त्यांनी हे विधान केलं आहे. आत सगळेच खोक्याभाईच भरलेत, असंही यावेळी राज ठाकरे म्हंटले.

बीडच्या सुरेश धस यांच्या खोक्या भोसलेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्याचे काही पैसे उडवतानाचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेले आहेत. त्यावरून राज ठाकरे यांनी ही टीका केली आहे. यावेळी भाषण करताना राज ठाकरे म्हणाले की, एक खोक्या भाई काय घेऊन बसले आहे, अख्खी विधानसभा भरलेली आहे. सगळे खोक्या भाईच भरलेत आतमध्ये. मुळ विषय बाजूला राहतात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीत तुम्हाला भरकटवून टाकलं जातं, असंही राज ठाकरे म्हणाले.

Published on: Mar 23, 2025 04:01 PM
Drought In Marathwada : मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
Nagpur News : संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास