काल इशारा अन् आज कारवाई; माहिम पाठोपाठ सांगलीतही हालचालींना वेग

| Updated on: Mar 23, 2023 | 10:35 AM

Raj Thackeray Gudhi Padava sabha 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल गुढीपाडव्यानिमित्त सभा घेतली. यात त्यांनी माहिमच्या दर्गाहचा तसंच सांगलीतील मस्जिदच्या बांधकामाचा मुद्दा मांडला. त्यानंतर आता हालचाली वाढल्या आहेत.

सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडव्याच्या सभेत बोलताना माहिमच्या दर्गाह परिसरातील अनधिकृत बांधकाम आणि सांगलीतील मस्जिदच्या बांधकामाचा उल्लेख केला. त्यानंतर आज हालचालींना वेग आला आहे. राज ठाकरे यांनी सांगलीतील ज्या अनाधिकृत मस्जिद बांधकामाचा उल्लेख केला. त्या ठिकाणी सांगली महानगरपालिका नगररचना विभागाकडून मोजणी सुरु झाली आहे. या मस्जिदच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, माहिममधील अतिक्रमणदेखील हटवण्यात आलं आहे. खाडीतील मजारच्या जागेवरील हिरवा झेंडा हटवण्यात आला आहे. तसंच अनधिकृत मजारवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे.

Published on: Mar 23, 2023 10:27 AM
माहिमच्या दर्गाह अनाधीकृत बांधकाम हे… ; मनसे नेत्याने मविआवर खापर फोडले
माहिम कारावईनंतर बावनकुळे म्हणाले, अतिक्रमण काढणे म्हणजे…