पुण्येश्वर मंदिर, मनसेच्या आरोपानंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त
दरम्यान, पुण्यात पुन्हा पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिर परिसरातील अनधिकृत मशिदीचे बांधकामाचा मुद्दा समोर आला आहे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्याच्या सभेत लाव रे तो व्हीडिओ म्हणत माहीममध्ये भर समुद्रात दर्गा बांधला जातोय असे म्हटलं होतं. त्यानंतर सरकारला अल्टीमेट देत कारवाई करा अन्यथा आम्ही बघून घेऊ असा इशारा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती जाग्यावर कारवाई करत बुल्डोजर फिवण्यात आला. त्यानंतर अशाच अनधिकृत बांधकामांच्यावर आता कारवाईची मागणी वाढत आहे. सांगलीतही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यात पुन्हा पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिर परिसरातील अनधिकृत मशिदीचे बांधकामाचा मुद्दा समोर आला आहे. तर राज्य सरकारने या ठिकाणी उत्खनन करावं अशी मागणी केली आहे. तर मनसेच्या आरोपानंतर मंदिर परिसरात पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर जोपर्यंत मागणी पुर्ण होत नाही तोपर्यंत हा मुद्दा लावून धरला जाील असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.