कसबा पोटनिवडणुकीत मनसे नेते कुणाचा प्रचार करणार? पाहा मनसेची भूमिका नेमकी काय?
पुण्यातील कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीत मनसेची भूमिका नेमकी काय असणार? याबाबतची अपडेट समोर आली आहे. पाहा...
पुण्यातून मनसेबाबतची महत्वाती बातमी. पुण्यातील कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीत मनसेची भूमिका नेमकी काय असणार? याबाबतची अपडेट समोर आली आहे. राज ठाकरेंचा आदेश येईपर्यंत कसबा पोटनिवडणुकीतील प्रचारात कोणीही सहभागी होऊ नका, असं सांगण्यात आलं आहे. पदाधिकारी प्रचारात आढळून आल्यास मनसेकडून कारवाई केली जाणार आहे. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षांतर्गत सूचना देण्यात आल्या आहेत. राज ठाकरे कसबा पोटनिवडणुकीत तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता आहे. प्रचारात सहभागी होऊ नका मनसेचे पदाधिकाऱ्यांना आदेश आहेत.
Published on: Feb 08, 2023 12:13 PM