“सुप्रियाताई, प्रबोधनकार ठाकरेंना के.सी.ठाकरे म्हणण्या एवढ्या तुम्ही मोठ्या झालेला नाहीत”
"सुप्रियाताई, प्रबोधनकार ठाकरेंना के.सी.ठाकरे म्हणण्या एवढ्या तुम्ही मोठ्या झालेला नाहीत", असं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
मुंबई : “सुप्रियाताई, प्रबोधनकार ठाकरेंना के.सी.ठाकरे म्हणण्या एवढ्या तुम्ही मोठ्या झालेला नाहीत”, असं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक ट्विट केलं होतं. ते ट्विट त्यांनी आता डिलीट केलं आहे. प्रबोधनकार के. सी. ठाकरे असा या ट्विटमध्ये उल्लेख होता. प्रबोधनकार ठाकरे यांची आज 137 वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांनी हे ट्विट केलं होतं. ते ट्विट त्यांनी डिलीट केलं आहे. त्यावरून संदीप देशपांडे यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.
Published on: Sep 17, 2022 12:12 PM