संदीप देशपांडे आणि एकनाथ शिंदे यांची भेट, युतीच्या चर्चांना उधाण

| Updated on: Sep 10, 2022 | 11:39 AM

मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

मनसे आणि भाजप युती होईल अशी चर्चा आहे. अश्यातच आता घडामोडींना वेग आलाय. मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्यासोबत संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यात चर्चा झाली. या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मनसे आणि भाजप पक्की झाली असल्याचं बोललं जात आहे.

Published on: Sep 10, 2022 11:36 AM
महाफास्ट 100: आताच्या घडीच्या महत्वाच्या बातम्या, पाहा एका क्लिकवर…
नंदुरबारमध्ये दादा-बाबा गणपतीची हरीहर भेट मोठ्या उत्साहात संपन्न