अशोक खरात याची बुद्धी इतकी चालत नाही; खरा मास्टरमाईंड कोण? मनसे नेत्याचा प्रश्न
यादरम्यानच या प्रकरणात मनसे नेते अमेय खोपकरांनी आदित्य ठाकरे-संजय राऊतांचे नाव घेतल्याने वातावरण तापलं होतं. त्यावरून देशपांडे यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर 3 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्कवर हल्ला झाला. हा हल्ला अशोक खरातने कट रचून केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तर या हल्ल्याचा खरा मास्टरमाईंड कोण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. यादरम्यानच या प्रकरणात मनसे नेते अमेय खोपकरांनी आदित्य ठाकरे-संजय राऊतांचे नाव घेतल्याने वातावरण तापलं होतं. त्यावरून देशपांडे यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याप्रकरणी पोलिस प्रशासनाचा आपल्याशी कोणताही संवाद झालेला नाही. तर खरात याची आधीची माहिती घेतली तर त्याला इतकी अक्कल आहे की तो कट रचू शकतो असं वाटतं नसल्याचे म्हटलं आहे. तर त्याने स्वत: च्या बुद्धीच्या जोरावर हा कट रचला असावा असेही वाटत नसल्याचे ते म्हणाले.
Published on: Apr 05, 2023 11:58 AM