जितेंद्र आव्हाड यांच्या खोचक टोला; मनसे नेत्याचा पलटवार; खरमरीत टीका करत म्हणाला, ‘ते आधी उंबरटे झिजवायचे’

| Updated on: Jun 15, 2023 | 9:01 AM

तर “भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले आहेत, ते पाहिलं मी. ते मुख्यमंत्री व्हावेत अशी मनापासून इच्छा आहे. सध्या एकच आमदार आहे. नुसत्या नकला काढून होणार नाही, असा टोला आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला होता.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत शुभेच्छा बॅनर लावले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टोला लगावला होता. तर “भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले आहेत, ते पाहिलं मी. ते मुख्यमंत्री व्हावेत अशी मनापासून इच्छा आहे. सध्या एकच आमदार आहे. नुसत्या नकला काढून होणार नाही, असा टोला आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला होता.

त्यावर आता मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काळे यांनी, आव्हाड यांच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा हा काढून घेण्यात आलेला आहे, आणि ते आत्ता राज ठाकरे यांच्यावर बोलत आहेत असा सवाल केला आहे. तर ज्यांच्या पक्षाचे 4 खासदार आहेत आणि त्या पक्षाच्या नेत्यांना पंतप्रधानांची स्वप्न पडू लागतात तेंव्हा. लोकांच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांचे बॅनर लागले. कारण कोविडच्या काळात प्रत्येक वर्गाला राज ठाकरे यांनी मदत केलेली आहे.

जितेंद्र आव्हाड ठाण्याच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये मदत मागण्यासाठी राज ठाकरे यांच्या घराचे उंबरटे झिजवायचे सभा लावा म्हणून बोलायचे. पण आता ते बोलत आहेत. ठाण्यात राज ठाकरे यांनी घेतलेला सभेमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या संदर्भात गरगर फिरवण्याची जे वक्तव्य केलं होतं. कदाचित गे त्यामधून अजून बाहेर पडलेले नाही असा टोला देखील काळे यांनी लगावला आहे.

Published on: Jun 15, 2023 09:01 AM
उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्र्यांनी दिली खुली ऑफर; म्हणाले, “तुमच्यासाठी भाजपची दारं कायम खुली”
“फडणवीसांची लोकप्रियता कमी दाखवण्यात आली” , शिवसेनेच्या जाहिरातीवरून एकनाथ खडसेंचा चिमटा