राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? सुषमा अंधारे यांचे मोठं वक्तव्य; म्हणाल्या, ‘पाण्यात काठी मारल्यानं….’

| Updated on: Jul 05, 2023 | 8:24 AM

तर त्याच्या आधी राज ठाकरे यांनी शिवसेनेशी फारकत घेत महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष तयार केला होता. यानंतर आता राष्ट्रवादीत अशी उभी फुट पडल्याने राज्यात राजकारणाचं पुर्ण चिखल झाल्याची भावना सामान्य कार्यकर्ता आणि मतदाराची झाली आहे.

मुंबई : राज्यातील राजकारणासह सत्तेची समिकरणं बदलत चाललेली आहेत. अनेक वर्षांपासून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातून नेत्यांचं जाणं येण सुरू होतं. पण गेल्या तीन एक वर्षात शिवसेना आणि आता राष्ट्रवादीत मात्र दोन गट तयार झाले आहे. तर त्याच्या आधी राज ठाकरे यांनी शिवसेनेशी फारकत घेत महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष तयार केला होता. यानंतर आता राष्ट्रवादीत अशी उभी फुट पडल्याने राज्यात राजकारणाचं पुर्ण चिखल झाल्याची भावना सामान्य कार्यकर्ता आणि मतदाराची झाली आहे. तर आता शिवसेना आणि मनसे म्हणजेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी मनसे कार्यकर्तेच करताना दिसत आहेत. त्यावरून ठाकरे गट शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी पाण्यावर कोणी काठी मारली म्हणून ते विभागत नाही. नाती, ऋणानूबंध आहेत ती काही बोलून तुटत नसतात. कार्यकर्त्यांचा मागणी जर आहे तर याच्यावर फारच विचार केला पाहिजे. अभिनंदन करत कौतुक पण केले पाहिजे. पण शेवट निर्णय हा पक्ष नेतृत्वाने घ्यायचा. तर जोपर्यंत याच्यावर राज ठाकरे स्पष्ट बोलत नाही तोपर्यंत यावर स्पष्ट बोलणं कठीण असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Published on: Jul 05, 2023 08:24 AM
अजित पवार यांच्या मंत्र्यांना खाती देणाऱ्यावरून शिंदे गटात मतमतांतर? अमोल मिटकरी यांनी स्पष्टच सांगितलं…
अजित पवार की शरद पवार? खरा ‘राष्ट्रवादी’ कोण? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणतात…