VIDEO | धर्मांतरवरून भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठा आरोप? दिला कोणता इशारा?
राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गेममध्ये मधून कधी धर्मांतर होऊ शकत का असा सवाल केला. तर त्यापाठोपाठ मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात धर्मांतरासाठी आमिश दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
मुंबई : मोबाईल गेम धर्मांतर प्रकरण मुंब्र्यात उघडकीस आलं त्यानंतर पोलिसांनी आरोपी शाहनवाझ मकसूदला अटक केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गेममध्ये मधून कधी धर्मांतर होऊ शकत का असा सवाल केला. तर त्यापाठोपाठ मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात धर्मांतरासाठी आमिश दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावरून तेथेही पोलिसांनीही महाविद्यालय प्रशासन, उपप्राचार्यासह आयोजकांवर गुन्हा दखल केलाय. या दोन्ही घटनांसह राज्यात सुरू असणाऱ्या औरगंजेबच्या स्टेटवरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याचमुद्द्यावरू भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाना साधला आहे. त्यांनी, राष्ट्रवादीवर आरोप करताना, गेल्या दोन-तीन वर्षांपासून आम्ही हेत सांगत होतो, की लव्ह जिहाद असो किंवा अमिषा दाखवून धर्मांतर ही प्रकरणे मविआच्या आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये असतानाची आहेत. ती आत्ता उघडकीस येत आहेत. या सगळ्या प्रकरणांचा आम्ही 100% शेवटपर्यंत छडा लावू. तर अमित्य दाखवून किंवा फसवून करून जे कोणी धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतायेत त्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्याचं काम कायद्याच्या कक्षेत राहून राज्य सरकार शंभर टक्के करेल.